कसा थांबवायचा चालढकलपणा?
लहानपणी आपण सगळ्यांनी ससा आणि कासवाची गोष्ट ऐकली असेल. अजून थोडं पळाल्यानंतर आपण जिंकू हे माहिती असून सुद्धा सशाने पळण्याचा कंटाळा केला. त्यामुळे कमी वेगात पण न थांबता चालणार कासव जिंकलं. ससा आणि कासवाची ही गोष्ट म्हणजे आपल्याला मिळालेला चालढकलपणाचा पहिला धडा होता. सध्याच्या वेगवान युगात, आपल्या ऊर्जेचे सर्वात जास्त नुकसान कोणी केलं असेल तर ते म्हणजे चालढकलपणानं. चालढकलपणा म्हणजे महत्त्वाची कामे टाळून शुल्लक गोष्टी करत बसणं. हे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती असेल. पहाटे उठून व्यायाम न करता झोपून राहणं, अभ्यास महत्वाचा आहे हे माहिती असून सुद्धा सतत टीव्ही पाहत राहणं अशी काही चालढकलपणाची उदाहरणे आहेत. याबरोबरच आपल्याला आवडणारी पण हानिकारक किंवा शुल्लक असणारी एखादी गोष्ट आपली गैरसोय होईल, कदाचित आपल्याला बैचेन वाटेल या चिंतेमुळे आपण न थांबता करत राहतो यालाही चालढकलपणाच म्हणतात. फेसबूक, व्हॉट्सऍप, पबजी, व्यसनं ही या चालढकलपणाची काही उदाहरणे आहेत. चालढकलपणामुळे आपला वेळ आपण वाया घालवतो आणि अगदी शेवटच्या क्षणी घाई गडबडीत आपलं काम आपण पूर्ण करतो. बहुतेक कॉलेजमधली मुलं त्यांच्या असाईनमे...