प्लॅस्टिकसारखे मज्जातंतू आणि मेंदू

प्लॅस्टिकसारखे मज्जातंतू हे वाचताना थोडं वेगळं नांव वाटलं ना? काही जणांना कदाचित विचित्रसुद्धा वाटू शकेल. पण खरोखर आपल्या मेंदूतले मज्जातंतू प्लॅस्टिकसारखेच असतात. मेंदूतील साधारण ८०% भाग हा मज्जातंतूंचाच बनलेला आहे. हे मज्जातंतू आपल्या मेंदू मध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या रस्त्यांसारखे किंवा वायरिंग सारखे असतात. आपल्या विचार- भावना- वर्तणुकीवर मज्जातंतूंचा प्रभाव हा जास्त आहे. प्लॅस्टिक आपण गरम केलं कि हवं तसं वाकवू शकतो, त्याला हवा तसा आकार देऊ शकतो अगदी तसंच आपण जर आपण कष्ट घेतले तर आपल्याला मेंदूतील मज्जातंतूंना जसे हवे आहेत तसे बदलू शकतो. याला इंग्रजी मध्ये न्युरोप्लास्टिसिटी असं म्हणतात. न्युरोप्लास्टिसिटी नुसार, जेंव्हा आपण एखादी नवी गोष्ट शिकतो तेव्हा आपण आपल्या मेंदूमध्ये मज्जातंतूंची एक पाउलवाट तयार होते. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की पाऊलवाटेने प्रवास करायला रस्त्यापेक्षा नक्कीच जास्त वेळ लागतो. त्या पाऊलवाटेचे रुपांतर रस्त्यामध्ये करायचे असेल तर आपल्याला ती पाउलवाट सतत वापरावी लागते. खूप दिवस ती पाउलवाट वापरल्यानंतर हळूहळू त्याचा कच्चा रस्त...