पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उपयुक्त चिंता

इमेज
उपयुक्त चिंता? हे कसले नाव आहे? चिंता उपयुक्त असू शकते? मानसिक ताणतणावासाठी आणि मानसिक आजारासाठी जर सर्वात जास्ती कोणी जबाबदार असेल तर चिंतेचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. चिंता कोणास जाणवत नाही? जगातील सर्व माणसांना, लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना चिंता जाणवते. आपण जर इतिहासात डोकावून पाहिलं तर आपल्याला आढळेल की इतिहासातील अनेक प्रसंगांना चिंतेमुळे किंवा चिंता नसल्यामुळे एक अनोखी, सुदैवी अथवा दुर्दैवी कलाटणी मिळाली आहेच. पण मग चिंता म्हणजे काय? चिंता कशाला म्हणता येईल?  मागील लेखात आपण पाहिल्या प्रमाणे आपले विचार आपल्या भावना निर्माण करत असतात तर मग कोणत्या प्रकारचे विचार चिंता निर्माण करतात? काय वाटलं की आपण चिंताग्रस्त होतो? जेव्हा आपल्याला भविष्य नकारात्मक वाटते आणि त्या भविष्यात घडणाऱ्या नकारात्मक घटनेचा आपण सामना करू शकत नाही, ती घटना आपण सहन करू शकणार नाही असे जेव्हा आपल्याला वाटते तेव्हा आपल्या मनात चिंता निर्माण होते. समजा आपल्याला आपल्या ऑफिसला बरोबर अकरा वाजता पोचायचे आहे आणि वाहतुकीच्या समस्येमुळे ट्रॅफिक जॅम मुळे तुम्हाला असं वाटतं की ‘मी अकरा वाजेपर्यंत ऑफिसला पोह...