विचार, भावना आणि समस्या
आज आपण आपल्या विचार आणि भावनांवर चर्चा करणार आहोत. सहाजिकच आपलं ध्येय मानसिक आरोग्य टिकवणे असे असल्याने प्रामुख्याने आपण मानसिक आरोग्य धोक्यात आणणाऱ्या नकारात्मक विचार आणि नकारात्मक भावनांचा विचार करू. हा विषय मांडताना कॉग्नेटिव्ह बिहेविअरल थेरपी (विचार-वर्तन-मानसोपचार पद्धती) म्हणजेच CBT विचार आणि भावनेकडे कोणत्या दृष्टीने पाहते आणि विचार आणि भावनांचा उपचार सीबीटी मध्ये कसा केला जातो याविषयी सुद्धा पाहणार आहोत. भावना म्हणजे काय आणि भावनांचा उगम सीबीटी नुसार विचारांच्या मुळे होणारी मनाची अवस्था म्हणजेच भावना होय. याचाच अर्थ भावनेचा उगम हा विचारांमध्ये असतो. जसा आपण विचार करतो तशा पद्धतीची भावना आपल्या मनामध्ये निर्माण होत असते आणि ही भावनाच आपल्याला वर्तन करण्यासाठी प्रेरित करत असते. यालाच विचार-भावना-वर्तन त्रिकोण असे म्हणतात. याचाच अर्थ एखाद्या प्रसंगातील आपले वर्तन हे त्या प्रसंगात घडणाऱ्या घटनांमुळे होत नसते. तर त्या प्रसंगाकडे आपण कोणत्या दृष्टीकोनातून पाहतो आणि काय विचार करतो यावर अवलंबून असते. हे समजून घेण्यासाठी आपण एका उदाहरणाचा वापर करू. यश ने एका वक्तृत्व स्पर्धेत भाग घ...