पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शारीरिक चिंता

इमेज
माझ्या क्लिनिक मध्ये सुमेध माझ्याशी बोलत होता. वजन अगदीच कमी झालेलं दिसत होतं. डोळ्यांखाली काळी वर्तुळे देखील आलेली होती. त्याच्या बोलण्यात निराशा दिसत होती. ‘माझ्या छातीत थोडसं दुखत होतं. मी ईसीजी काढला. ऍन्जिओग्राफी केली. सगळी उपलब्ध साधनं वापरून वेगवेगळ्या टेस्ट केल्या. पण सगळे रिपोर्ट नॉर्मल. डॉक्टर म्हणाले, तुम्हाला काहीच झालेलं नाही. मी सेकंड ओपिनियन घ्यायचं म्हणून दुसऱ्या स्पेशालिस्ट डॉक्टरांना दाखवलं. त्यांनी अजून काही वेगळ्या टेस्ट सांगितल्या. त्याही केल्या. पण रिपोर्टमध्ये तरीही काहीच निघालं नाही. पण दुखणं तर होतचं. त्यामुळे मी पुन्हा नवीन डॉक्टरांना भेटलो. गेल्या वर्षभरात सहा-सात डॉक्टर झाले. पण सगळ्यांकडे रिपोर्ट नॉर्मल. शरीरात काहीच दोष नाही असं सगळ्यांचं म्हणणं पडलं. मी काय करू? मला कळेनासं झालंय. कोणत्याच डॉक्टरांकडून समाधान झालं नाही म्हणून शेवटचा पर्याय मी इंटरनेट-गुगल वर याचा शोध घेतला. त्यात आलेल्या वेबसाइटनं असं सांगितलं की छातीत दुखत असेल तर हार्ट अटॅक येऊ शकतो आणि यामुळे माणूस मरुही शकतो. हे वाचल्यानंतर तर मला वाटू लागलं की आता मी मारणार. मी मेलो तर माझ्या कुटुंबी...