ओ. सि. डी.
मला सतत हात धुण्याची सवय लागली आहे. मला असं वाटतं की माझ्या हातावर घाण आहे. त्यात जंतू आहेत. आणि ते घालवण्यासाठी हात धुणे गरजेचेच आहे. नाहीतर मला काहीतरी होईल. असा विचार येऊन मी हात धुतो. थोडा वेळ बरे वाटते. पण नंतर काही काळाने पुन्हा हाच विचार येतो, कारण तेव्हा कुठेतरी हात इकडे तिकडे लागलेला असतो. पुन्हा हात धुतो आणि हे चक्र सुरूच राहते. त्यातून मी बाहेरच पडू शकत नाही. माझ्या कौन्सिलिंग सेंटर मध्ये नुकताच नोकरी सुरू केलेला सुनील मला त्याची समस्या सांगत होता. सुमेधाच्या ह्या समस्येला ऑबसेसिव्ह कंपलसिव्ह डिसऑर्डर (ओ.सि. डी.) असं म्हणतात. ओ.सि. डी. म्हणजे पछाडलेल्या, मन व्यापून टाकलेल्या विचारांमुळे सतत करावी लागणारी अनिवार्य अशा कृतीची समस्या. एका उदाहरणाने हे अजुन जास्ती स्पष्ट होईल. ड्रायव्हर म्हणून कामाला असलेल्या दिनकर रावांना गाडी विषयी खूप प्रेम. पण त्याच वेळी ही गाडी चोरीला जाईल अशी चिंता हळूहळू त्यांच्या मनात घर करू लागली. त्यामुळे गाडी चालवून झाली की प्रत्येक दरवाजा मी नीट बंद केला आहे ना याची खात्री होण्यासाठी प्रत्येक दार ते तपासून ओढून पाहायला लागले. पुढची तपासणी झाली ...