पोस्ट्स

एप्रिल, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विशिष्ट भय (फोबिया)

इमेज
तीस वर्षाची अरुणा आपल्या नवऱ्यासोबत माझ्या कौंसेलिंग सेंटर मध्ये येऊन बसली होती. बाहुल्यांची प्रचंड भीती वाटते अशी तिची तक्रार होती. प्रत्यक्षात बाहुली दिसली की तिला भीती वाटायचीच. पण जर टीव्हीमध्ये बाहुली दिसली तरी तिला त्रास व्हायचा. ती परिस्थिती अरुणा सहनच करू शकत नव्हती. त्या जागेवरून ती पळूनच जायची. तिचा चेहरा पांढरा फटक पडायचा. बाहुली किंवा बाहुलीचा चित्राची सुद्धा अरुणाला प्रचंड भीती वाटे. आपल्याला आजूबाजूला आपण असेल अनेक लोक पाहत असतो ज्यांना कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती वाटत असते. काही जणांना उंचीचा त्रास होतो तर काहींना कुत्र्यांची भीती वाटते. काही लोक अंधाराला घाबरतात तर काही लोक सापांना, पालीला इ. माझ्या सेंटर असाही एक मुलगा आला होता ज्याला मासे खायची फार आवड होती. मेलेल्या माशांची अजिबात भीती वाटत नसे पण त्याला फिश टॅंक मधले मासे पाहून भीती वाटायची. अशा विशिष्ट गोष्टींच्या वाटणाऱ्या भीतीला फोबिया असं म्हणतात. फोबिया किंवा भय निर्माण करणारी गोष्ट टाळण्याचा प्रयत्न करणे; न टाळता आल्यास, त्या ठिकाणाहून शक्य तितक्या लवकर पळून जाण्याचा प्रयत्न करणे हे फोबियाचं प्रमुख लक्षण ...