स्ट्रेस मॅनेजमेंट
काही दिवसांपूर्वी रोहितच्या आईवडिलांना कोणीतरी सांगितलं, तुमचा रोहित आज आम्हाला शाळेच्या वेळेत गावाबाहेर फिरताना दिसला. सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष केलं पण दोन-तीन जणांकडून पुन्हा असंच ऐकायला मिळाल्यावर मात्रं त्यांनी आज रोहितला याबद्दल विचारलं. सुरुवातीला तो हे मान्य करत नव्हता पण खडसावून विचारल्यावर आणि शाळेत चौकशी करण्याची तंबी दिल्यावर त्याने चूक कबूल केली. आणि मला शाळेत आजिबातच जायचं नाही असं सांगायला लागला. पालकांना अजिबातच कळत नव्हतं कि याला नेमकं झालंय तरी काय? अगदी रोज आवडीनं शाळेला जाणारा रोहित सहामाही नंतर असं का वागतोय हे त्यांना कळत नव्हतं. तसा रोहित अभ्यासात, खेळात आणि गायनात हुशार होता. आत्ता पर्यंत झालेल्या शालेय परीक्षेत त्याला उत्तम गुण मिळाले होते. परंतु या सहामाही परीक्षेत त्याचे गुण विलक्षण फरकाने कमी झाले होते. पण शाळा, मित्रं, शिक्षक यावर तो फार बोलायचा नाही. त्याचे एका विषयाचे शिक्षक ‘त्याच्या मते’ त्याला उगाचच टार्गेट करत होते. आणि हि गोष्ट सलग २-३ महिने चालली होती. आणि त्यामुळे त्याची वर्गातली ‘इमेज’ खराब होत होती. शिवाय शिक्षक चिडवतात म्हंटल्यावर वर्गाती...