आनंदाचं सेलिब्रेशन
T-२० विश्वचषक २०१६. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना. बांगलादेशला भारताच्या विरुद्ध T-२० सामन्याच्या पहिल्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी ३ बॉलमध्ये केवळ २ धावांची गरज होती. भारताने केलेल्या १४७ धावांच्या आव्हानातील १४५ धावा बांगलादेशने सहजपणे पूर्ण केल्या होत्या. बांगलादेशचा फलंदाज सामना पूर्ण झाल्याच्या अविर्भावात खेळत होता. तो खूप उत्साहित झाला होता. षटकार मारून आपल्या देशाला विजय मिळवून देण्यासाठी त्याने जोरात बॉल फटकावला. अति उत्साहामुळे बॉल त्याला नीट मारता आला नाही आणि षटकाराऐवजी भारताच्या खेळाडूच्या हातात सोपा झेल गेला. पुढे आलेला फलंदाज यातून काही धडा घेऊ शकला नाही. तो सुद्धा अशाप्रकारे बाद झाला. शेवटच्या बॉलवर आणखी एक फलंदाज रनआउट करून भारताने हा सामना २ धावांनी जिंकला. भारत हा सामना जिंकला असं म्हणण्यापेक्षा बांगलादेश हा सामना हरला असंच म्हणावं लागेल. कारण जरी भारतीय कर्णधाराने ताणाचे समायोजन योग्य प्रकारे केले तरी हातात आलेली मॅच घालवण्यासाठी बांगलादेशी फलंदाजांनी लवकर सुरु केलेल्या मॅच जिंकण्याच्या आनंदाच्या सेलिब्रेशनमुळे त्यांचे उरलेल्या धावा काढण्यामागचे लक्ष उडाले ...