स्लिप हायजीन
मागच्या लेखात आपण झोपेचा डिसऑर्डर म्हणजेच इंसोमनिया बद्दलची प्रमुख लक्षणं जाणून घेतली आज आपण आपल्याला झोप उत्तम प्रतीची लागावी यासाठी असणारे काही महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊयात. हे मुद्दे इनसोमनिया असणाऱ्यांसाठी उपयोगाचे आहेतच; पण जर आपण सर्वांनी या मुद्द्यांचा वापर केला तर आपल्याला सुद्धा हे उपयोगी ठरतील. या मुद्द्यांना स्लिप हाइजीन असे म्हणतात. स्लिप हाइजीन म्हणजे झोप नीट येण्यासाठी करण्याचे किंवा पाळण्याचे नियम. आपण सोप्या भाषेत याला झोपेसाठीचे नियम असे म्हणूयात. नियम पहिला झोपेच्या व्यतिरिक्त आपला बेड, अंथरूण अजिबात वापरू नका. याचं कारण आपल्या बेड सोबत आपल्या मेंदूच्या कनेक्शन फक्त झोपे पुरतच असलं पाहिजे. सध्या आपल्यापैकी अनेकांना ही सवय असू शकेल की ज्या बेडवर आपण झोपतो त्यावरच अभ्यासाला, कामाला, वाचनाला, गप्पा मारायला, जेवायला, टीव्ही-मोबाईल पहायला बसणं. यामुळे काय होतं? मेंदूच आपल्या बेड सोबत असणारं झोपेचं कनेक्शन तुटायला सुरुवात होते. म्हणजेच, आपल्या मेंदूला आपण बेडवर बसल्यावर किंवा झोपल्यावर आपल्याला आता झोप यायला पाहिजे असा संदेश मिळत नाही. कारण या बेडवर आपण बऱ्याच ...