को जागर्ति
एकदा एका जंगलात एका सिंहिणीनं पिलाला जन्म दिला आणि जन्म देता-देताच ती सिंहीण मरण पावली. ते सिंहाचं पिल्लू अनाथ झालं. फिरत फिरत ते एका मेंढ्यांच्या कळपात आलं. त्या मेंढ्यांनी त्या सिंहाच्या पिल्लाचा सांभाळ करायचं ठरवलं. ते पिल्लू मेंढ्यांसोबतच वाढू लागलं. त्यांच्यासारखं गवत खायला शिकलं, मोठा आवाज झाला की घाबरून पळायलाही शिकलं. एकदा त्या मेंढ्यांच्या कळपावर एका मोठ्या सिंहानं आक्रमण केलं. त्या सिंहाला त्या मेंढ्यांच्या कळपात हा सिंहाचा छावा दिसला. या मोठ्या सिंहाला आश्चर्य वाटलं. हा इथं कसा? हे मेंढ्यांप्रमाणे त्याचंही वागणं का असावं? त्याची उत्सुकता जागृत झाली. त्या मोठ्या सिंहानं त्या बछड्याला पकडलं. त्याला घेऊन तो सिंह एका तलावापाशी आला. त्या छोट्या सिंहाला त्यानं तलावात पाहायला सांगितलं. सिंहाचं आणि आपलं प्रतिबिंब नीट न्याहाळल्यावर त्या छाव्याला जाणीव झाली. जो स्वतःला इतके दिवस मेंढी आहे असं मानत होता तो स्वतःच सिंह होता. त्या जंगलाचा अनभिषिक्त राजा होता... आपण बहुतेक सर्वांनी ही गोष्ट ऐकली, वाचली असेल. स्व-जाणीव, सेल्फ अवेअरनेस नसल्यावर आपण सिंहाची मेंढी कसे होतो हे या गोष्टीतून लगे...