आणि माझा कचरा झाला…?
आयुष्यातला पहिलाच इंटरव्ह्यू. खरं तर गेली अनेक वर्षं, खूप मन लावून, मी अभ्यास केला होता. आई-बाबांचं स्वप्न होतं की मी इंजिनिअर व्हावं. म्हणून इंजिनियरिंग पूर्ण केलं आणि त्या बळावर आयुष्यातला पहिला इंटरव्ह्यू देण्यासाठी वेटिंग रूम मध्ये मी बसलो होतो. माझ्यापेक्षा जास्त अनुभव असणारे, माझ्यापेक्षा कमी गुण - जास्त गुण असणारे असे विविध प्रकारचे उमेदवार माझ्याबरोबर या इंटरव्ह्यूला आले होते. काही जणांची मुलाखत झाली होती आणि आम्ही साधारण 5 जणं राहिलो होतो. आणि माझं नांव पुकारलं गेलं. मी माझ्या टायची गाठ नीट केली आणि १० पावलं चालत जाऊन केबिनचा दरवाजा उघडला. हा दरवाजा उघडत असताना मनात माझ्या आई-बाबांच्या माझ्याकडून असणाऱ्या आणि माझ्या स्वतःकडून असणाऱ्या अपेक्षा याबद्दलचे बरेच विचार डोक्यात घोळत होते. मला हा जॉब मिळलाच पाहिजे अशी माझी तीव्र इच्छा होती. नाही मिळाला तर काय? याचा विचार करणं सुद्धा मी टाळत होतो. या सगळ्याचा परिणाम असेल कदाचित, मी थोडा स्ट्रेसमध्ये आलो आणि इंटरव्हू पॅनेलला गुड आफ्टरनून ऐवजी गुड मार्निंग म्हणून पहिली चूक केली. अरे बापरे! माझं फर्स्ट इम्प्रेशन खराबच झालं असणार या विचारा...