गणाधिश जो ईश सर्वा गुणांचा
आज गणेश चतुर्थी. सर्व कला आणि विद्यांचा दाता श्री गणेशाचं आजच्या दिवशी आपल्या घरी आगमन होतं. सकल कला आणि विद्या देणारा हा गणेश गणाधिश सुद्धा आहे. गणाधिश, गणपती याचा सोप्या भाषेत अर्थ आहे लीडर. जो लीड, नेतृत्व करतो असा तो गणपती, गणाधिश. आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रातील लीडर बनण्याचा प्रयत्न करणं हा या दिवसाचा खरा अर्थ असावा असं मला वाटतं. चांगला लीडर व्हायचं असेल तर काय करावं लागेल? याचं उत्तरही गणेशानंच आपल्याला दिलेलं आहे. आपल्याला लीडर व्हायचं असेल तर आपल्याला एखादी नवीन कला, विद्या म्हणजेच कौशल्य शिकावं लागेल किंवा असणारं कौशल्य अजून उत्तम बनवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील हे खरं गणेश स्तवन आहे. लीडर बनण्यासाठी कोणतं कौशल्य आत्मसात करावं लागेल किंवा उत्कृष्ट करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील? याचं उत्तर आहे life skills म्हणजेच जीवन कौशल्य. WHO नं 10 life skills सांगितले आहेत जी अंगी बाणवून आपण आपलं आयुष्य आपलं जीवन अधिक समाधानाने जगू शकू. एखादा चांगला लीडर व्हायचं असेल तर पहिल्या टप्प्यात हेच 10 life skills आपल्याला मदत करतील. हे 10 life skills कोणते? 1.संभाषण कौशल्...