Worry Free Tree


आज आपण चिंता कमी करण्यासाठी एक विशिष्ट टेक्निक पाहणार आहोत. ही टेक्निक अतिविचार करणाऱ्यांसाठी एक राम बाण उपाय आहे. या टेक्निकमुळे आपण उगाच काळजी म्हणजेच worry न करता आपली चिंता व्यवस्थित सोडवू शकू. चिंतेला सिस्टिमॅटिकली म्हणजेत पद्धतशीरपणे कमी करण्यासाठी चिंतेचा त्रास असणाऱ्यांना ही टेक्निक मदत करेलच त्याबरोबरच इतर सर्वांना आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठी सुद्धा मदत करेल. या तंत्राचा नाव आहे चिंता घालवणार झाड इंग्रजीमध्ये यालाच वरी फ्री ट्री असे म्हणतात. आता आपण ही टेक्निक कशी आहे ते पाहूया.

सर्वप्रथम आपल्याला यासाठी स्वतःला पहिल्यांदा एक प्रश्न विचारावा लागेल कि मी कोणत्या गोष्टीची काळजी किंवा चिंता करत आहे? हे उत्तर आपल्याला सहज मिळू शकेल.

आपल्याला या गोष्टीचे उत्तर मिळाल्यानंतर, आपल्याला स्वतःला दुसरा प्रश्न विचारायचा आहे. तो म्हणजे ही चिंता किंवा काळजी मी सोडवू शकतो का किंवा घालवू शकतो का? याची दोन उत्तरेतील एक म्हणजे हो मी सोडवू शकतो आणि दुसरं म्हणजे नाही मी सोडवू शकत नाही.

यात प्रथमतः नाही हे उत्तर आलं तर काय करायचं ते पाहूयात.

नाही उत्तर आल्यावर आपण स्वतःला सांगायचे आहे की जर की चिंता मी सोडवू शकत नाही म्हणजेच जर हे माझ्या हातातच नाही तर चिंता जाऊ देत. आणि त्यानंतर आपण त्यावेळी जे काम करत आहोत ते थांबवून किमान दोन मिनिटं वेगळं काम करायचे आहे.

हे स्वतःला चिंता जाऊ देत असे का म्हणायचे हे आपण पुढं समजून घेऊयात.

आता दुसऱ्या उत्तराकडे म्हणजे जर हो उत्तर आलं तर काय करायचं ते पाहुयात.

जर हो उत्तर आलं तर पुन्हा स्वतःला विचारायचे आहे ते म्हणजे कधी मी ही चिंता सोडवू शकतो?

आता याची पुन्हा दोन उत्तरे येतील. एक म्हणजे आत्ता. दुसरं म्हणजे नंतर.

जर आत्ता उत्तर आलं तर लगेच चिंता सोडवून टाका आणि जर नंतर उत्तर आलं तर नंतर कधी ही चिंता सोडवणार याच नीट प्लॅनिंग म्हणजेच योजना करा. वेळ-दिनांक ठरवा.

चिंता सोडवल्यावर किंवा नंतरची योजना केल्यावर पुन्हा स्वतःला आपल्याला, नाही उत्तरानंतर सांगितल्याप्रमाणे, चिंता जाऊ देत असं सांगायचं आहे. आणि नंतर आपण जे काम करत आहोत तेथे थांबवून दोन मिनिटं दुसरं काम करायचं आहे. या दोन गोष्टी का करायचे आहेत याचे उत्तर आहे आपल्या मेंदूला संकेत मिळण्यासाठी की मी माझ्या काळजी अथवा चिंतेवर काम केलं आहे. आता यावर मला अजून वेळ-विचार खर्च करायचे नाहीत.

म्हणजे चिंता जाऊ देत असं सांगितल्यावर आणि उठून किमान दोन मिनिटात दुसरे काम केल्यावर मेंदूला चिंतेवर अति विचार करण्याची जी सवय लागली आहे ती थांबवण्याचा मेसेज किंवा संकेत पोहोचेल आणि आपल्या चिंतेवरचं आपलं काम पूर्ण होईल.

समजा हे केलं आणि जर पुन्हा चिंता आली तर काय करायचं? तर पुन्हा याच पद्धतीप्रमाणे आपल्याला चिंतेवरती काम करायचं म्हणजेच वरी फ्री ट्रीचा वापर करायचा. कारण चिंता पद्धतशीरपणे सोडवणं हे महत्त्वाचं नुसतच त्यावर अति विचार करून चिंता सुटत नाही.

ह्या वरी फ्री ट्रीची एक इमेज याबरोबर तुम्हाला दिसेल. ती पाहून तुम्हाला टेक्निक अजून चांगल्या प्रकारे कळेल.



धन्यवाद.

अजिंक्य गोडसे
सायकोथेरपिस्ट
डॉ हेडगेवार रुग्णालय, इचलकरंजी.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करूया ताणाचा सामना

को जागर्ति

आणि माझा कचरा झाला…?