पोस्ट्स

करूया ताणाचा सामना

इमेज
एका ऑफिसमध्ये एक प्रचंड शिस्तीचे साहेब होते. जरा सुद्धा कामात चूक झाली तर साहेबांसमोर धडगत नसायची. ऑफिसमधले सगळे साहेबांना प्रचंड घाबरायचे. एक दिवस ऑफिसमध्ये काम करणाऱ्या शुभमला साहेबांनी एक महत्वाचं पत्र लिहायला सांगितलं. शुभमनं डोळ्यात तेल घालून अत्यंत वळणदार अक्षरात ते पत्र लिहिलं. दोन-दोन वेळा तपासून त्यानं ते पत्र साहेबांकडं पाठवलं. दहा मिनिटात साहेबांचा शिपाई शुभमकडे आला आणि म्हणाला कि तुम्हाला साहेबांनी ताबडतोब बोलवलं आहे. हे ऐकून शुभमला खूपच चिंता वाटायला लागली. शुभमला टेंशन आलं. आणि त्यानंतर शुभम साहेबांना न भेटता अर्धी रजा टाकून तो घरी निघून गेला. टेंशन आल्यावर शुभम असा का वागला? या परिस्थिती पासून पळ काढल्याचा त्याला फायदा होईल कि त्यानं अजून काही करायला हवं होतं?   हे शोधायला आपण थोडं इतिहासात जाऊयात. उत्क्रांतीच्या काळात सामोऱ्या येणाऱ्या आव्हानांना, ताणाला, टेंशनला आदिमानव कसा सामोरं जात असेल? समजा त्याचा सामना एका वाघाशीच झाला. तर तो या वाघाला कसा सामोरं जात असेल? या किंवा अशा ताणाच्या प्रसंगात आदिमानव पहिल्यांदा घाबरायचा. त्यानंतर त्याच्यासमोर २ पर्याय असायचे एकतर...

आणि माझा कचरा झाला…?

इमेज
आयुष्यातला पहिलाच इंटरव्ह्यू. खरं तर गेली अनेक वर्षं, खूप मन लावून, मी अभ्यास केला होता. आई-बाबांचं स्वप्न होतं की मी इंजिनिअर व्हावं. म्हणून इंजिनियरिंग पूर्ण केलं आणि त्या बळावर आयुष्यातला पहिला इंटरव्ह्यू देण्यासाठी वेटिंग रूम मध्ये मी बसलो होतो. माझ्यापेक्षा जास्त अनुभव असणारे, माझ्यापेक्षा कमी गुण - जास्त गुण असणारे असे विविध प्रकारचे उमेदवार माझ्याबरोबर या इंटरव्ह्यूला आले होते. काही जणांची मुलाखत झाली होती आणि आम्ही साधारण 5 जणं राहिलो होतो. आणि माझं नांव पुकारलं गेलं. मी माझ्या टायची गाठ नीट केली आणि १० पावलं चालत जाऊन केबिनचा दरवाजा उघडला. हा दरवाजा उघडत असताना मनात माझ्या आई-बाबांच्या माझ्याकडून असणाऱ्या आणि माझ्या स्वतःकडून असणाऱ्या अपेक्षा याबद्दलचे बरेच विचार डोक्यात घोळत होते. मला हा जॉब मिळलाच पाहिजे अशी माझी तीव्र इच्छा होती. नाही मिळाला तर काय? याचा विचार करणं सुद्धा मी टाळत होतो. या सगळ्याचा परिणाम असेल कदाचित, मी थोडा स्ट्रेसमध्ये आलो आणि इंटरव्हू पॅनेलला गुड आफ्टरनून ऐवजी गुड मार्निंग म्हणून पहिली चूक केली. अरे बापरे! माझं फर्स्ट इम्प्रेशन खराबच झालं असणार या विचारा...

हम होंगे कामयाब

इमेज
प्रसंग 1 - 24 मार्च 2021, पंतप्रधान मोदींनी संपूर्ण देश लॉकडाऊन करत असल्याची घोषणा केली. संपूर्ण जग हळूहळू कोरोनाच्या विळख्यात अडकत चाललं होतं. परिस्थिती तशी गंभीरच होती. चीन मधून आलेल्या या विषाणूचा प्रादुर्भाव हा प्रचंडचं होता. याच सुमारास विवेकला अकौंटसच्या एका कंपनीत नवी नोकरी लागली होती. कोरोनामुळं झालेल्या लॉकडाऊनचा परिणाम होऊन, कंपनीनं बरेचसे कर्मचारी कामावरून कमी केले. साहजिकच, जे नवीन नोकरीस लागले होते, त्यांना याचा फटका जास्त बसला. विवेकला ही त्याची नोकरी गमवावी लागली. याबाबद्दल विवेकला अत्यंत मानसिक त्रास झाला. त्याचा आत्मविश्वास कमी झाला. पुन्हा एकदा सगळं सुरळीत झाल्यावर त्याच कंपनीनं विवेकला संपर्क साधला पण विवेकनं त्या कंपनीस नकार कळवला. परत एकदा निराशा हाती लागेल अशी चिंता त्याला जाणवत होती. हा नकार पचवणं अवघड जाईल असा विचार करून त्यानं ती कंपनी जॉईन केली नाही. आत्ताही त्याला काही ऑफर्स येतात पण नकाराच्या चिंतेनं तो त्या स्वीकारत नाही. मुलाखतीला सुद्धा जात नाही.  प्रसंग 2 - पुन्हा एकदा 24 मार्च 2021, पंतप्रधान मोदींनी संपूर्ण देश लॉकडाऊन करत असल्याची घोषणा केली. याच ...

आपण त्यांच्या समान व्हावे

इमेज
 (CBT या मानसोपचार पद्धतीचे जनक डॉ. ऍरॉन बेक यांचं दि. ०१ नोव्हेंबर २०२१ रोजी वयाच्या १००व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या कार्याची माहिती देणारा हा लेख.)  1960च्या सुमारास मानसशास्त्राच्या जगतावर सिग्मंड फ्रॉईड या विख्यात मानसशास्त्रज्ञाचं राज्य होतं. फ्रॉइड यांनी स्वतः एक मानसोपचार पद्धतीचा म्हणजेच थेरपीचा शोध लावला होता. सायकोऍनॅलिसिस हे त्या थेरपीचं नांव. जगातले बहुतेक सर्व प्रमुख मानसशास्त्रज्ञ या सायकोऍनॅलिसिसचाच वापर करत होते. सायकोऍनॅलिसिसचा वापर करणाऱ्यांना सायकोऍनॅलिस्ट म्हंटलं जायचं. त्याच काळात पेनिसेल्व्हियाच्या विद्यापीठात एक प्रोफेसर मानसोपचार शिकवत होते. ते प्रोफेसर सुद्धा सायकोऍनॅलिस्ट होते. पण या सायकोऍनॅलिसिसचा म्हणावा तितका उपयोग क्लायंटला होत नाहीये असं त्यांना वाटत होतं. कारण या सायकोऍनॅलिसिस पद्धतीच्या काही मर्यादा होत्या. एकतर किती दिवस हि थेरपी वापरावी याची ठोस अशी कोणतीही वेळ देता येत नव्हती. आणि नेमकी सायकोऍनॅलिसिसची पद्धत काय आहे याबाबत पण स्पष्टता नव्हती. याचा परिणाम मानसिक डिसऑर्डर दुरुस्त व्हायला खूप वेळ लागायचा. कधी कधी तो दुरुस्त व्हायचाच नाही. स...

को जागर्ति

इमेज
एकदा एका जंगलात एका सिंहिणीनं पिलाला जन्म दिला आणि जन्म देता-देताच ती सिंहीण मरण पावली. ते सिंहाचं पिल्लू अनाथ झालं. फिरत फिरत ते एका मेंढ्यांच्या कळपात आलं. त्या मेंढ्यांनी त्या सिंहाच्या पिल्लाचा सांभाळ करायचं ठरवलं. ते पिल्लू मेंढ्यांसोबतच वाढू लागलं. त्यांच्यासारखं गवत खायला शिकलं, मोठा आवाज झाला की घाबरून पळायलाही शिकलं. एकदा त्या मेंढ्यांच्या कळपावर एका मोठ्या सिंहानं आक्रमण केलं. त्या सिंहाला त्या मेंढ्यांच्या कळपात हा सिंहाचा छावा दिसला. या मोठ्या सिंहाला आश्चर्य वाटलं. हा इथं कसा? हे मेंढ्यांप्रमाणे त्याचंही वागणं का असावं? त्याची उत्सुकता जागृत झाली. त्या मोठ्या सिंहानं त्या बछड्याला पकडलं. त्याला घेऊन तो सिंह एका तलावापाशी आला. त्या छोट्या सिंहाला त्यानं तलावात पाहायला सांगितलं. सिंहाचं आणि आपलं प्रतिबिंब नीट न्याहाळल्यावर त्या छाव्याला जाणीव झाली. जो स्वतःला इतके दिवस मेंढी आहे असं मानत होता तो स्वतःच सिंह होता. त्या जंगलाचा अनभिषिक्त राजा होता... आपण बहुतेक सर्वांनी ही गोष्ट ऐकली, वाचली असेल. स्व-जाणीव, सेल्फ अवेअरनेस नसल्यावर आपण सिंहाची मेंढी कसे होतो हे या गोष्टीतून लगे...

न धरी शस्त्र करी

इमेज
मित्रांनो, आज खंडेनवमी. आज आपण आपल्या अवजारांची पूजा करतो, यंत्रांची पूजा करतो, शस्त्रांची पूजा करतो. लहानपणापासून हा संस्कार आपल्याला मिळाला आहे. या शस्त्र-पूजनात मी अनेक आयुधांची पूजा करताना पहात आलोय. ही आयुधं पाहत असताना अनेकदा या आयुधांसोबत आणखी एक गोष्ट असली पाहिजे असं मला नेहमी वाटत आलंय. ती गोष्ट काय आहे हे तुम्हाला या प्रसंगावरून लक्षात येईलच. महाभारतातल्या शेवटच्या युद्धापूर्वीचा प्रसंग. अर्जुन आणि दुर्योधन दोघेही कृष्णाला भेटायला द्वारकेला आले होते. दोघांनाही कृष्णाकडून युद्धामध्ये मदतीची अपेक्षा होती. कृष्णाने दोघांसमोर दोन पर्याय ठेवले. एका बाजूला होती कृष्णाची यादवांची नारायणी सेना आणि दुसऱ्या बाजूला होता फक्त कृष्ण. तो ही निःशस्त्र. दुर्योधनापेक्षा वयानं लहान असल्यानं अर्जुनाला यातून निवड करण्याची पहिली संधी मिळली. अर्जुनानं या दोन्ही पर्यायातून निःशस्त्र कृष्णाची निवड केली. अर्जुनाच्या या निर्णयाचा दुर्योधनाला फारच आनंद झाला. कारण त्याला कृष्णाची सेनाच पाहिजे होती. अर्जुनाच्या निर्णयानं त्याचं काम सोपं झालं असं दुर्योधनाला वाटलं. पण पुढील इतिहास आपण सर्वजण जाणतोच. कृष्ण...

गणाधिश जो ईश सर्वा गुणांचा

इमेज
आज गणेश चतुर्थी. सर्व कला आणि विद्यांचा दाता श्री गणेशाचं आजच्या दिवशी आपल्या घरी आगमन होतं. सकल कला आणि विद्या देणारा हा गणेश गणाधिश सुद्धा आहे. गणाधिश, गणपती याचा सोप्या भाषेत अर्थ आहे लीडर. जो लीड, नेतृत्व करतो असा तो गणपती, गणाधिश. आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रातील लीडर बनण्याचा प्रयत्न करणं हा या दिवसाचा खरा अर्थ असावा असं मला वाटतं. चांगला लीडर व्हायचं असेल तर काय करावं लागेल? याचं उत्तरही गणेशानंच आपल्याला दिलेलं आहे. आपल्याला लीडर व्हायचं असेल तर आपल्याला एखादी नवीन कला, विद्या म्हणजेच कौशल्य शिकावं लागेल किंवा असणारं कौशल्य अजून उत्तम बनवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील हे खरं गणेश स्तवन आहे. लीडर बनण्यासाठी कोणतं कौशल्य आत्मसात करावं लागेल किंवा उत्कृष्ट करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील? याचं उत्तर आहे life skills म्हणजेच जीवन कौशल्य. WHO नं 10 life skills सांगितले आहेत जी अंगी बाणवून आपण आपलं आयुष्य आपलं जीवन अधिक समाधानाने जगू शकू. एखादा चांगला लीडर व्हायचं असेल तर पहिल्या टप्प्यात हेच 10 life skills आपल्याला मदत करतील. हे 10 life skills कोणते? 1.संभाषण कौशल्...

नातं म्हणजे काय?

इमेज
कोल्हापूर जिल्ह्यातील नेहमीची एक सकाळ... पुण्याहून कोल्हापूरमधल्या एका गावात नुकतीचं लग्न होऊन आलेल्या सखूला तिचा नवरा म्हणजेच रामनाथ म्हणतो... सखू जरा चावीला पाणी आलंय का ते पाहतेस का? सखूला जरा गम्मत वाटली. चावी तर कुलूप उघडायला वापरतात. तिच्यातून पाणी कसं येईल? पण तरीही तिनं जाऊन एकदा कुलपाची चावी तपासली. पण तिच्यातून पाणी येतंय असं काही तिला दिसलं नाही... तिला काहीच कळेना. ती परत रामनाथकडं गेली. त्याला म्हणाली कि चावीतर ठणठणीत आहे. तीला काही पाणी आलेलं नाही. रामनाथ म्हणाला ठीक आहे. पण मनात म्हणाला कि रोज तर यावेळीच चावीला पाणी येतं आज काय झालं? काहीतरी अडचण झाली असेल म्हणून तो बाहेर त्याच्या आलेल्या मित्राला भेटायला गेला तर त्याला दिसलं कि शेजारी असणाऱ्या नळाला तर धो धो पाणी आहे. त्याला काहीच कळेना. त्याला वाटलं कि सखूला काही काम करायचं नाहीये. त्याला थोडा तिचा राग आला. पण तिला काही न बोलता त्यानं मित्राशी गप्पा मारल्या आणि नंतर आत मध्ये गेला. सखूशी जरा हटकूनचं वागायला लागला. सखूला वाटलं कि आज काहीतरी झालंय. सकाळपासून आमचे हे काहीपण बोलत आहेत आणि आता कसं पण वागत आहेत. तिची सुद्धा य...

स्व-जाणीवेसाठी SWOT

इमेज
गंगेच्याकाठी असणाऱ्या अलाहबाद शहरात एक लहान मुलगा त्याच्या वडिलांसोबत राहायचा. त्याच्या वडिलांना कुस्तीचे फार अप्रूप. आपल्या मुलानं कुस्तीत नांव कमवावं, नावाजलेला पैलवान व्हावं असं त्याच्या वडिलांना मनापासून वाटायचं. ते त्याला रोज तालमीला पिटाळायचे. त्याच्याकडून भरपूर व्यायाम करून घ्यायचे. यामुळे मुलाचं शरीर मजबूत आणि पोलादी झालं. पण मुलाला कुस्तीत आजिबातच रस नव्हता. केवळ वडिलांच्या इच्छेखातर आणि त्यांचा मार मिळू नये म्हणून केवळ तो व्यायाम करायचा. त्याची आवड होती संगीत. जसजसा तो मोठं होऊ लागला तशी त्याची संगीताकडे ओढ अजूनच वाढायला लागली. हळूहळू त्याच्या लक्षात आलं, त्याला जाणीव झाली कि संगीतच त्याच्या आयुष्याचं ध्येय आहे. वडिलांच्या आग्रहाखातर आपण कुस्ती शिकू, पैलवानही होऊ, पण आपल्याला त्यामध्ये समाधान मिळणार नाही. मनाचा हिय्या करून एकेदिवशी मुलाने आपल्या वडिलांना त्याला जे वाटतं ते सांगितलं. मुलाला कुस्ती आवडत नाही हे ऐकून वडिलांना वाईट वाटलं. पण तरी त्यांनी मुलाला संगीत शिकण्याची परवानगी दिली. हा मुलगा म्हणजेच जगविख्यात बासरी वादक पं. हरिप्रसाद चौरासिया. हरीजींना त्यांच्या ‘स्व’ ची ज...

स्ट्रेस मॅनेजमेंट

काही दिवसांपूर्वी रोहितच्या आईवडिलांना कोणीतरी सांगितलं, तुमचा रोहित आज आम्हाला शाळेच्या वेळेत गावाबाहेर फिरताना दिसला. सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष केलं पण दोन-तीन जणांकडून पुन्हा असंच ऐकायला मिळाल्यावर मात्रं त्यांनी आज रोहितला याबद्दल विचारलं. सुरुवातीला तो हे मान्य करत नव्हता पण खडसावून विचारल्यावर आणि शाळेत चौकशी करण्याची तंबी दिल्यावर त्याने चूक कबूल केली. आणि मला शाळेत आजिबातच जायचं नाही असं सांगायला लागला. पालकांना अजिबातच कळत नव्हतं कि याला नेमकं झालंय तरी काय? अगदी रोज आवडीनं शाळेला जाणारा रोहित सहामाही नंतर असं का वागतोय हे त्यांना कळत नव्हतं.  तसा रोहित अभ्यासात, खेळात आणि गायनात हुशार होता. आत्ता पर्यंत झालेल्या शालेय परीक्षेत त्याला उत्तम गुण मिळाले होते. परंतु या सहामाही परीक्षेत त्याचे गुण विलक्षण फरकाने कमी झाले होते. पण शाळा, मित्रं, शिक्षक यावर तो फार बोलायचा नाही. त्याचे एका विषयाचे शिक्षक ‘त्याच्या मते’ त्याला उगाचच टार्गेट करत होते. आणि हि गोष्ट सलग २-३ महिने चालली होती. आणि त्यामुळे त्याची वर्गातली ‘इमेज’ खराब होत होती. शिवाय शिक्षक चिडवतात म्हंटल्यावर वर्गाती...

संवाद कौशल्य

इमेज
शिवाजी महाराजांनी जावळीच्या घनदाट खोऱ्यातील चंद्रराव मोरेची जहागीरी नेस्तनाबूत केली. त्यावेळी मोरेचा एक मावळा दोन्ही हाती दांडपट्टा घेऊन झुंझत होता. त्याच्या या आघातांमुळे महाराजांचा कोणताही सैनिक पुढे सरकू शकत नव्हता. अगदीच वेळ आली असती तर धनुष्यबाण चालवणाऱ्या सैनिकाला बोलावून त्या मावळ्याला हटवता आलं असतं. परंतु, महाराजांनी त्या वीर मावळ्याशी संवाद साधून आपलं, ‘श्रींचं’ स्वराज्य स्थापनेचं आपलं ध्येय त्याला इतक्या कुशलतेनं पटवून दिलं कि तो त्यानंतर स्वराज्याचा एकनिष्ठ पाईक बनला. पुढे तो मावळा किल्लेदार झाला. पुरंदरावर घडलेल्या त्याच्या स्वामीनिष्ठेच्या प्रसंगाशिवाय शिवचरित्र पूर्ण होऊच शकत नाही. त्या किल्लेदाराचं नाव आहे मुरारबाजी देशपांडे. शिवाजी महाराजांनी ठरवलं असतं तर ते मुरारबाजीला धारातीर्थी पाडू शकले असते. पण त्यांनी वेगळा विचार केला. असा मोहरा मारण्यापेक्षा स्वराज्याच्या कामी आला पाहिजे हा विचार. हा वेगळा दृष्टीकोन. शिवचरित्रात असे योग्य दृष्टीकोन असणारे प्रसंग आपल्याला विपुल प्रमाणात दिसतात. या उदाहरणावरून वरून लक्षात येतं कि घडणाऱ्या किंवा घडलेल्या घटनेपेक्षा आपला त्या घटनेक...

स्लिप हायजीन

इमेज
मागच्या लेखात आपण झोपेचा डिसऑर्डर म्हणजेच इंसोमनिया बद्दलची प्रमुख लक्षणं जाणून घेतली आज आपण आपल्याला झोप उत्तम प्रतीची लागावी यासाठी असणारे काही महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊयात.  हे मुद्दे इनसोमनिया असणाऱ्यांसाठी उपयोगाचे आहेतच; पण जर आपण सर्वांनी या मुद्द्यांचा वापर केला तर आपल्याला सुद्धा हे उपयोगी ठरतील. या मुद्द्यांना स्लिप हाइजीन असे म्हणतात. स्लिप हाइजीन म्हणजे झोप नीट येण्यासाठी करण्याचे किंवा पाळण्याचे नियम. आपण सोप्या भाषेत याला झोपेसाठीचे नियम असे म्हणूयात.  नियम पहिला झोपेच्या व्यतिरिक्त आपला बेड, अंथरूण अजिबात वापरू नका. याचं कारण आपल्या बेड सोबत आपल्या मेंदूच्या कनेक्शन फक्त झोपे पुरतच असलं पाहिजे. सध्या आपल्यापैकी अनेकांना ही सवय असू शकेल की ज्या बेडवर आपण झोपतो त्यावरच अभ्यासाला, कामाला, वाचनाला, गप्पा मारायला, जेवायला, टीव्ही-मोबाईल पहायला बसणं. यामुळे काय होतं? मेंदूच आपल्या बेड सोबत असणारं झोपेचं कनेक्शन तुटायला सुरुवात होते. म्हणजेच, आपल्या मेंदूला आपण बेडवर बसल्यावर किंवा झोपल्यावर आपल्याला आता झोप यायला पाहिजे असा संदेश मिळत नाही. कारण या बेडवर आपण बऱ्याच ...

झोपेची समस्या (इन्सोमनिया)

इमेज
 50 वर्षांचे भीमराव सांगत होते. "लॉकडाउन झाल्यानंतर लगेचच माझ्या व्यवसायावरती परिणाम झाला. तसा फार मोठा माझा व्यवसाय नाही पण साठवलेल्या पैशांवर त्या वेळचे दिवस काढले. मुलगा अजून शिकतोय त्यामुळे त्याच्यावर ही फार भार देता येत नव्हता. साधारण दोन ते अडीच महिने मी खूप ताणात होतो. त्यानंतर पुन्हा काम सुरू झालं; व्यवसाय सुरू झाला. पैसेही मिळू लागले. पण लॉकडाऊन दरम्यान गेलेली झोप मात्र काही परत आली नाही. त्यामुळे गेले अनेक दिवस मी नीट झोपूच शकलेलो नाही. जर झोप लागलीच तरी पुन्हा लगेच जाग येते. रात्री झोप न झाल्याने सकाळी मी कामावर जाऊ शकेन का? व्यवस्थित काम करू शकेन का? मला चक्कर तर नाहीना येणार? या आणि अशा अनेक शंका मनात येतात. यामुळे, माझा कामावर जाण्याचा आत्मविश्वासच निघून गेलेला आहे. याचा परिणाम आता माझ्या व्यवसायावर होताना मला दिसू लागला आहे. झोप तर लागत नाहीये; व्यवसाय नीट करता येत नाहीये;  यामुळे मी अगदीच हतबल होऊन गेलो आहे. काय करावं काहीच कळेनासं झालेलं आहे. जस जशी रात्र जवळ येते तस तशी आता मला माझ्या झोपेचं काय होणार याची भयंकर चिंता वाटू लागते. मी काय करू? मला काहीच सुचत ना...

Worry Free Tree

इमेज
आज आपण चिंता कमी करण्यासाठी एक विशिष्ट टेक्निक पाहणार आहोत. ही टेक्निक अतिविचार करणाऱ्यांसाठी एक राम बाण उपाय आहे. या टेक्निकमुळे आपण उगाच काळजी म्हणजेच worry न करता आपली चिंता व्यवस्थित सोडवू शकू. चिंतेला सिस्टिमॅटिकली म्हणजेत पद्धतशीरपणे कमी करण्यासाठी चिंतेचा त्रास असणाऱ्यांना ही टेक्निक मदत करेलच त्याबरोबरच इतर सर्वांना आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठी सुद्धा मदत करेल. या तंत्राचा नाव आहे चिंता घालवणार झाड इंग्रजीमध्ये यालाच वरी फ्री ट्री असे म्हणतात. आता आपण ही टेक्निक कशी आहे ते पाहूया. सर्वप्रथम आपल्याला यासाठी स्वतःला पहिल्यांदा एक प्रश्न विचारावा लागेल कि मी कोणत्या गोष्टीची काळजी किंवा चिंता करत आहे? हे उत्तर आपल्याला सहज मिळू शकेल. आपल्याला या गोष्टीचे उत्तर मिळाल्यानंतर, आपल्याला स्वतःला दुसरा प्रश्न विचारायचा आहे. तो म्हणजे ही चिंता किंवा काळजी मी सोडवू शकतो का किंवा घालवू शकतो का? याची दोन उत्तरेतील एक म्हणजे हो मी सोडवू शकतो आणि दुसरं म्हणजे नाही मी सोडवू शकत नाही. यात प्रथमतः नाही हे उत्तर आलं तर काय करायचं ते पाहूयात. नाही उत्तर आल्यावर आपण स्वतःला सांगायचे आहे की जर की च...